style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | Avantar:February 2018

 

अवांतर

अक्षर म्हणजे काय ते बहुतेक कळतही नसतं अशा वयात लहानपणी आपली अक्षर ओळख करून दिली जाते. हळूहळू कित्ते गिरवत हाताला वळण लागतं आणि प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने अक्षरं रेखू लागतो. अर्थातच लेखनाची ही कृती काळाच्या ओघात सवयीची होऊन जाते. त्यामुळेच की काय, अत्यंत गृहीत धरली गेलेली हस्ताक्षरासारखी ‘क्षुल्लक’ गोष्ट आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही सांगेल असा विचारही करत नाही आपण. तीच तर खरी गंमत आहे. आपापल्या आवडी-सवडीनुसार अक्षराला जे वळण देतो आपण, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसतात. अर्थात त्यासाठी अभ्यास हवा आणि जाणकाराची नजरसुद्धा.

हस्ताक्षराचा आकार, वळण, काने-मात्रे देण्याची पद्धत, समास सोडण्याची किंवा न सोडण्याची सवय, दोन शब्दांमधलं, दोन ओळींमधलं अंतर अशा अनेक गोष्टी असतात ज्या व्यक्तीनुसार बदलतात. साधी स्वाक्षरी करण्याची पद्धत सुद्धा प्रत्येकाची वेगळी असते आणि त्या स्वाक्षरीतून सुद्धा माणसं वाचता येतात. लिहिलेला शब्द खोडण्याच्या पद्धतीवरुन सुद्धा स्वभाव समजतो. हस्ताक्षरावरुन स्वभाव ओळखता येतो, याचाच अर्थ, हस्ताक्षरात बदल करून व्यक्तीच्या वागण्यात बदल करता येऊ शकतो. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे शक्य होतं. वर्तनाप्रमाणेच आयुष्याचे मार्गही बदलता येऊ शकतात हस्ताक्षराच्या मदतीने. काळाच्या ओघात अक्षरात जे बदल होतात ते बघून व्यक्तीमध्ये होत गेलेले बदल सांगता येतात. व्यक्तीचं आरोग्य, तिला असलेले आजार आणि आजाराची कारणं हेसुद्धा समजतं हस्ताक्षरातून. हस्ताक्षरात बदल करून जे उपचार केले जातात त्या उपचारपद्धतीला Graphotherapy म्हणतात. आपल्या सुप्त मनात काय चाललंय हे आपल्याला समजत नाही, पण हस्ताक्षरातून ते दिसू शकतं; आणि अर्थातच त्या सुप्त मनाला दिशाही देता येते, हस्ताक्षराच्या मदतीने.

असे अनेक पैलू आहेत या हस्ताक्षराचे. यापुढे जाऊन, हस्ताक्षरावरुन पूर्वजन्माविषयी काही सांगता येईल का याविषयीचं संशोधनही सुरू आहे.

विशेष म्हणजे, स्वाक्षरीवरुन माणसाचा स्वभाव समजत असला तरी नुसतंच एखादं अक्षर पाहून व्यक्तीची पारख करता येत नाही. इतर अक्षरं, लिहिण्याची पद्धत वगैरे बरंच काही पहावं लागतं. याचाच अर्थ, शितावरुन भाताची परीक्षा होतेसुद्धा आणि नाही सुद्धा. खरंच मोठा रंजक विषय आहे हा.. आणि तितकाच गहनसुद्धा.

हस्ताक्षरामुळे व्यक्तिमत्त्वाची पारख कशी होते त्याची बरीच माहिती श्रीकांत परांजपेंनी सांगितली आणि या विषयाबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढलं.

असंच कुतूहल वाढविण्यासाठी आणि शमविण्यासाठी अवांतरमध्ये यायलाच हवं. तर मग पुढच्या अवांतर मध्ये येणार ना!

मार्च २०१८ मध्ये आणखी एक वेगळा विषय आम्ही घेऊन येत आहोत तो म्हणजे, ‘छायाचित्रण’. खरंतर, छायाचित्रणात वेगळं ते कायॽ असा प्रश्न पडू शकतो. पण हातात कॅमेरा आहे म्हणून छायाचित्रणात पारंगत नाही होत कोणी. एक कला आहे ती आणि तिचंही एक शास्त्र आहे. या कलेविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणूनच याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत, मिहीर टोकेकर. तर मग अवांतरच्या पुढच्या सत्रासाठी २१ मार्च, २०१८चा दिवस नक्की राखून ठेवा.


English Summary



We are introduced to the Alphabet at a very early age. A child may not even know that he or she is looking at letters and what may be their purpose. Soon enough, recognition is followed by the attempt to write. With practice and age, a child understands the purpose and syntax of language and even develops his or her own style of writing. Beyond the purpose of communicating, we seldom think about our handwriting. We become so used to it, that we don’t even think if there would be some more aspects of this ‘trivial’ thing. Handwriting can reveal the personality of the writer. In fact, the way one writes, unveils many personality traits of a person. Of course, analysing this requires a thorough knowledge of reading people through their handwriting.

There are many things like size and style of handwriting, margins, distance between words and lines etc, which differ from person to person. How we sign our name or erase/ delete written words also changes from person to person. These differences and minute observations can help us to analyse a person’s nature and personality. So if handwriting can reveal personality traits, the question is can it help in altering behaviour patterns as well? Handwriting experts believe, this is possible, especially in the case of children as they are still in the developmental stage of writing. This therapy is called Graphotherapy. This realm of study can inform us about the gradual changes in personality, health, diseases and even the reasons behind those diseases. It can even read and shape the subconscious mind of a person.

So, there is more to handwriting than what meets the eye. To add to these, now experts are trying to find out if handwriting can throw some light on the past life of a person.

However, although a signature can reveal many personality traits, any single letter is not enough to describe the person. One has to consider some other factors too. Indeed, this topic is very interesting, vast and intense.

In an interactive session of Avantar, Shrikant Paranjape shared many such details of the topic and made us more curious about the mysteries of handwriting analysis.

So, come join us in the next session of Avantar to hear more about another interesting subject- Photography.

In March 2018, we will try and share some knowledge about Photography. Photography has become very common for us, but very few know the proper techniques of the same. Just buying a camera is not enough to master this art. Mihir Tokekar would help us to know more about it. So please don’t forget to attend the next session of Avantar on 21st March, 2018.


Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts