style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article  | Avantar:July 2017

 

श्वास, स्वभाव आणि प्रकृती

 

तुम्ही श्वास घेता काॽ

असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारलाय काॽ विचारलाच कधी तर तुम्ही नक्कीच त्या माणसाला वेड्यात काढाल.साहजिकच आहे ना! जन्मापासून मरेपर्यंत अगदी अविरतपणे केली जाते अशी एकच तर गोष्ट आहे, ती म्हणजे श्वास घेणं.इतकी स्वाभाविक असते ही क्रिया. पण खरंच तिच्याबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतंॽ तुम्हाला कदाचित वाटेल की श्वासोच्छ्वासाबद्दल काय माहीत असायला पाहिजेॽ श्वास घेत रहायचा असतो आणि घेत रहावा लागतो, आणखी कायॽ

पण हे इतकंच नाही.यामागे एक व्यवस्थित पार्श्वभूमी आहे.मानवी शरीर हे पंचमहाभूतांचं मिळून बनलेलं असतं, पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांच्या पाच विचारशक्ती असतात. जसे पृथ्वी-अहंकार, जल-चित्त, तेज-बुद्धी, वायू-मन आणि आकाश-आत्मा आणि या पाच विचारशक्तींवर नियंत्रण ठेवतो तो श्वास.इतका हा श्वास महत्त्वाचा आहे.हा श्वास घेण्याचीसुद्धा एक पद्धत आहे. सहसा आपला श्वासोच्छ्वास नकळत सुरू असतो. ठरवून, लक्ष देऊन श्वास घेण्याची क्रिया आपण करत नाही.पण शास्त्र असे सांगते की या श्वसनाच्या क्रियेकडे जाणूनबुजून लक्ष द्या.Be with your breath. श्वासावर लक्ष केंद्रित करा. कुठलेही काम करत असताना तुमच्या श्वासावर तुमचे लक्ष असू दे. असे केल्याने श्वासोच्छ्वास अधिक क्षमतेने केला जातो. नकळतपणे तुमचे शारीरिक, मानसिक ताण कमी होतात. आपले मन स्मृतींच्या आधारे काम करत असते. विशिष्ट पद्धतीने श्वास घेतला तर मनातील त्या स्मृती जाग्या होतात. अगदी पूर्वजन्मीच्या स्मृती जाग्या करण्याची क्षमताही या श्वासोच्छ्वासामध्ये असते. गंमत म्हणजे, सलग काही वर्षे विशिष्ट पद्धतीने प्राणायाम केला तर सर्व पूर्वस्मृती पुसूनही टाकता येतात.

थोडक्यात सांगायचे तर, श्वासोच्छ्वासाची क्रिया वाटते साधी पण अनेक अनपेक्षित परिणाम साधू शकते आणि हे केवळ माणसांच्या बाबतीतच नाहीतर, सर्वच सजीवांच्या बाबतीत शक्य आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, दोन वर्षांपूर्वी पावसाअभावी दुष्काळ पडलेला होता.तेव्हा डॉ.हेमांगी जांभेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ झाडांच्या श्वसनावर आधारित उपचार करून हजारो एकर बागा वाचवल्या तेही नेहमीपेक्षा निम्म्या प्रमाणात पाणी देऊन.चमत्कारिक वाटेल पण हे खरं आहे.तर, अशा या श्वासाचा ध्यास घ्यायला तुम्हाला आम्हाला नक्कीच आवडेल. बरोबर ना!

अशाच वेगवेगळ्या विषयांची माहिती आपल्याला अवांतरच्या प्रत्येक सत्रात मिळणार आहे. तर मग पुढच्या अवांतर मध्ये भेटूया नक्की

ऑगस्ट महिन्यातल्या अवांतरचा विषय आहे- घोडेस्वारी म्हणजे काय रे भाऊआणि या विषयावर बोलणार आहेत दिग्विजय प्रतिष्ठानचे श्री.गुणेश पुरंदरे.

तर मग या आणखी एका वेगळ्या विषयासाठी१६ ऑगस्ट,२०१७ चा दिवस आणि संध्याकाळी पाच वाजताची वेळ नक्की राखून ठेवा.

© 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts