ध..मा..ल..म्हणजे
काय त्याचा
पुरेपूर
प्रत्यय
अवांतरच्या
कालच्या
सत्राला आला.
ओरिगामी
म्हणजे,
म्हटलं तर कागदाच्या
घड्या घालून
वस्तू
बनविण्याची
कला. पण त्या
कलेतलं कसब
काय काय
करामती करू
शकतं ते अगदी
व्यवस्थित
अनुभवायला
मिळालं. श्री.
बापट यांनी
स्वतः केलेली काही
मॉडेल्स –
हाताचा पंजा,
सिगारेट
बॉक्स,
काड्यापेटी
आणि ॲशट्रे,
घोडा इ. बघून
काहींना
स्फूर्तीही
मिळाली.ओरिगामी ही
नुसती कला
नाही, तर मोठ्या
मोठ्या
यांत्रिक
रचनांसाठी
ओरिगामीचा वापर
केला जातो,
हेही
यानिमित्ताने
समजलं. ओरिगामीच्या
आमच्या बापट 'गुरूजीं'नी
स्वतः तर छान
छान वस्तू
बनवल्याच, पण
आमच्याकडूनही
ओरिगामीचे
प्राथमिक धडे
गिरवून घेतले.
त्यांचे
आज्ञाधारक
विद्यार्थी
बनून ओरिगामी
शिकताना
आम्ही जी धमाल
केली ती
खरोखरच अवर्णनीय
होती.
खरंतर, त्या
धमालमस्तीसाठी
एक तासाचा वेळ
कमीच पडला आणि
त्याच्या वर्णनासाठी
या आठदहा
ओळीही पुरणार
नाहीत.