style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | Avantar:December 2017

 

अवांतर

लहानपणी जरा कळू लागेपर्यंत खेळायला तीनचाकी सायकल आणून दिली जाते. त्या छोट्याशा सायकलीवरून कितीतरी लांबचे पल्ले गाठण्याचा खेळ लहानपणी अनेकांनी खेळला असेल. नंतर वयानुसार सायकलीचा आकार वाढत शाळा-कॉलेजपर्यंत बऱ्यापैकी मोठी सायकल हातात येण्याचं भाग्य अनेकांना लाभलं असेल. शाळा-कॉलेज, क्लास, अभ्यास, मित्रमैत्रिणींसोबतची भटकंती अशा अनेक ठिकाणी ती सायकल सोबत करते. मग कधीतरी अचानक दुचाकी गाडी घरात येते आणि सायकलीची साथ सुटते. काही काळ जातो आणि व्यायामाच्या निमित्ताने सायकल पुन्हा आयुष्यात डोकावते. अर्थात काहीजण जिममधल्या सायकलीवर हौस भागवतात तर काहीजण रस्त्यावरून चालणाऱ्या सायकलीशी मैत्री करून भटकंती आणि व्यायाम असे दोन्ही योग साधतात. सायकलीचा आपल्या आयुष्यातला प्रवास साधारण याच क्रमाने होतो.

खरोखरंच व्यायामासाठी सायकल चालविणे हा एक उत्तम पर्याय आहे. पोहणे, चालणे, चढ चढणे, खेळणे, धावणे अशा इतर व्यायामप्रकारांच्या तुलनेत अनेक निकषांवर ती उजवी ठरते. सायकलीवर भटकंती करताना व्यायाम तर होतोच आणि भटकण्याचा आनंदही मिळतो. नेहमीची साधी सायकल तर बहुतेक सर्वांनाच माहीत असते, पण गियरच्या सायकलींचेही अनेक प्रकार आहेत. आपला नेमका उद्देश आणि गरज लक्षात घेऊन हव्या त्या प्रकारची सायकल निवडणं सोयीचं ठरतं. पण हे सायकलींगचं वेड कायम राहिल का अशी शंका काहीजणांना असते. त्यांच्यासाठी महिनाभर सायकल भाड्याने घेण्याची सुविधाही काही ठिकाणी उपलब्ध आहे. व्यायाम आणि फिरण्याचा आनंद हे पैलू तर आहेतच पण त्याजोडीने पर्यावरणाला हातभार हादेखील एक महत्त्वाचा फायदा या सायकलींगमुळे होतो. अशा या विविधप्रकारे फायदेशीर ठरणाऱ्या सायकलीचे तोटे जवळजवळ नाहीतच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ व्यायाम हा उद्देश असेल तर सायकलमुळे सर्वांगाला व्यायाम होत नाही हा एक तोटा म्हणता येईल. पण इतर पूरक व्यायामप्रकारांची जोड देऊन ती कमतरताही भरून काढता येते.

थोडक्यात म्हणजे सायकल चालविणं हे हरतऱ्हेने आनंदाचं ठरतं. किंबहुना या दोन चाकांवरच्या भटकंतीचं वेड लागलं की वेगवेगळ्या वाटा चोखाळून पहाव्याशा वाटतात, वेगवेगळी ठिकाणं आणि अगदी गड-किल्लेही आनंदाने सर केले जातात, आपल्या रोजच्या वाटांवरून गाडीवर भुर्रकन उडून जाताना जी सौंदर्यस्थळं दिसत नाहीत ती सायकलवरून निवांत जाताना सहज जाणवतात.. आणि मग पुण्यातलाच एखादा परिसर यूरोपसारखा दिसतो हा शोधही लागतो.

असेच काही मुद्दे मांडत उद्धव गोडबोले यांनी सायकलींग हा विषय उलगडून दाखविला आणि त्यासोबत सायकलची बरीचशी तांत्रिक माहितीदेखील सांगितली. एकंदरीतच सायकलींगचं वेड किती आणि कशाप्रकारे आपल्या उपयोगाचं ठरतं ते यानिमित्ताने समजलं.

अशाच नवनव्या विषयांची माहिती घेण्यासाठी अवांतरमध्ये यायलाच हवं. तर मग पुढच्या अवांतर मध्ये येणार ना!

फेब्रुवारी २०१८ मध्ये अवांतरची वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्ताने आणखी एक वेगळा विषय आम्ही घेऊन येत आहोत तो म्हणजे, ‘हस्ताक्षरातून कळणारा माणूस.’ आपलं हस्ताक्षर आपल्या स्वभावाविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी काय काय सांगू शकतं हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मग या विषयासाठी २१ फेब्रुवारी, २०१८चा दिवस नक्की राखून ठेवा.English SummaryA tricycle is every child’s first vehicle that takes him/her to many imaginary journeys to far off lands! As the child grows, so does the cycle- from a tricycle to a bicycle. A trusted buddy for the teenager, the bicycle accompanies the teen to every place, from school to college and from tuitions classes to the playground. Later at some point, if the family can afford it, the cycle gets replaced by a two-wheeler, either a scooter or a motorcycle. However, this doesn’t end the relationship with the cycle. Often, with age, fitness compels a person to pick up the bicycle again and pedal away to good health. This spells the life-cycle of the humble bicycle.

Bicycle riding is an excellent exercise. Not only does one enjoy the ride, it burns away the calories too. As a physical activity, it has immense benefits to the body as compared to their forms of exercise such as running, swimming or walking. Even though cycling is not a full-body workout, supplementary exercises can easily fill the gap.

The simple cycle is known to most people, but now the market is flooded with various types of geared cycles, as well as cycles suitable for different terrain and activities. One can choose from them considering the purpose and need of using it. For people who doubt if they can continue with this hobby, the option of renting a bicycle is the perfect solution. Most cycle scan be rented on monthly basis at reasonable charges. Other than physical exercise, a big advantage of cycling is its green factor. It is an eco-friendly way to get from place to place and helps to keep environment clean. So, it won’t be wrong to say that cycling has no disadvantages!

In essence, cycle riding is a pleasure. Once addicted to it, cycling compels a person to wander on new roads, see new places, arrange treks to forts etc. Moreover, nature’s beauty which is ignored while travelling in a motorised vehicle, is better appreciated during a leisure ride on the cycle.

Uddhav Godbole unveiled the topic of cycling with the help of such points and also gave a lot of valuable insights. Overall, the session was very informative to know how cycling can help one in many ways.

Make sure that you attend the next session of Avantar to hear on some other interesting topic like this.

Avantar is completing one year in February 2018. On this special occasion we have decided to introduce a topic that may interest many people - ‘Reading a person through handwriting’ Wouldn’t it be interesting to know what your handwriting reveals about your personality? So, don’t miss this session of Avantar on 21st February, 2018.

Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts