अवांतर
या
उपक्रमातील
पहिला
कार्यक्रम
दि.१५.०२.२०१७
रोजी पार
पडला.त्यावेळेस,
श्री. विनायक
देसाई यांनी
जनरल
इन्शुरन्स या
विषयाची
माहिती
आपल्या सहज
शैलीत उलगडून
दाखविली.111 खरेतर
जीवन विमा हा
विषय
आपल्यापैकी
अनेकांना
माहीत असतो.
पण
आरोग्यविमा,
घर, गाडी
किंवा अन्य
लहान-मोठ्या
मालमत्तांचा
विमा यांविषयी
बरेचजण
अनभिज्ञ
असतात; किंवा
त्याकडे नकळत
दुर्लक्षही
केले जाते. विम्याच्या
या इतर
प्रकारांचा
समावेश जनरल इन्शुरन्स
या विषयात
होतो आणि
जीवनविम्याइतकाच
हा विषयही
अतिशय
महत्त्वाचा
आहे.हीच बाब
समजावून
सांगताना
श्री.देसाई
यांनी त्यांचे
अनुभव आणि
काही
उदाहरणेही
दिली. विशेष
म्हणजे
थोडक्यात,
मुद्देसूदपणे
आणि
हलक्याफुलक्या
भाषेत आपला
विषय समजावून
सांगण्याचीहातोटी
त्यांना
लाभली आहे.
त्यामुळे
एरवी रुक्ष
किंवा निव्वळ
व्यावहारिक
वाटणारा जनरल
इन्शुरन्ससारखा
विषय खूप
सहजपणे
श्रोत्यांना
समजला आणि भावला.