बुद्धिजीवी
मंडळी नेहमीमहत्त्व देतात,
तेप्रखर
बुद्धीला,कलागुणांना,
कामाच्या
क्षमतेला.त्यामानाने, विशेषतः
मराठी मंडळी
आपल्या
दिसण्याला
विशेष
महत्त्व देत
नाहीत.जेव्हा आपण
संमिश्र
समूहात
वावरतो,
तेव्हा‘प्रथमदर्शनात’
कुणीतरी बाजी
मारून जातं
आणि कष्टाने
केलेल्या
कामाची, केवळ
दर्शनी छाप न
पडल्याने कमी
दखल घेतली
जाते, असा
अनेकांचा
अनुभव असेल.
यापलीकडेही
चांगलं,
टापटीप
राहाण्याने
वातावरण
प्रसन्न
राहातं,
कार्यक्षमता
वाढते, सहकाऱ्यांमधे
प्रसन्नता
राहाते. उपजत
रंगारूपाला
छान टवटवीत
कसं ठेवावं,वेळ-पैसा-प्रयत्न
यांच्या
मर्यादेत
स्वतःचं
व्यक्तिमत्त्व
कसं खुलवावं
हे पल्लवी
पाटगावकरांकडूनऐकताना
सर्व वयाचे
स्त्रीपुरुष
सहभागी
तल्लीन झाले
होते. स्वतःमध्ये
चांगलं काय
आहे ते शोधा.
जसे
आहात तसे
स्वतःला
स्वीकारा, स्वतःवर
प्रेम करा. स्वतःचं
कौतुक स्वतः
करा. वय, वजन
वगैरे कशाचा
न्यूनगंड
बाळगू नका.वय हे
वाईनसारखं
असतं, जितकं
मुरलेलं
तितकं सुंदर.
मी सुंदरच आहे
असं मनापासून
स्वतःला सांगा..
आणि मग हे
सौंदर्य
जपण्यासाठी,
खुलवण्यासाठी
काहीगोष्टी करा.
जसं, नीटनेटके
आणि
प्रसंगानुरूप
कपडे करणं,
आपल्याला
साजेलसा माफक मेकअप
करणं,योग्य
देहबोली,
पुरेसा आत्मविश्वास
आणि एक छानसं
स्मितहास्य.
एवढी शिदोरी
पुरेशी असते
आपली चांगली
छाप पडण्यासाठी.
असे अनेक
विचार पल्लवी
पाटगावकरांनी
मांडले आणि
व्यक्तिमत्त्व
खुलवणं ही
किती छान गोष्ट
आहे ते पटवून
दिलं. खरं
तर प्रत्येकाला
एक नवीन
सौंदर्यदृष्टी
दिली