कधीतरी एक
विनोद वाचला
होता.
एकदा एक
डॉक्टर
त्यांच्या
पेशंटला काही
औषधं देतात
आणि त्यासोबत
काय काय खायचं
ते समजावून
सांगतात.
पेशंट
विचारतो,हे जे
काही पदार्थ
खायला
सांगितलेत ते
जेवणाआधी
खायचे की
जेवणानंतरॽ
डॉक्टर
म्हणतात, अहो,
हे जेवणाऐवजी
खायचंय..तरच
बरे व्हाल
तुम्ही.
विनोदाचा
भाग सोडला तर
रोज नेमका
कोणता आहार घ्यायचा
याची माहिती
आपल्यापैकी
कितीजणांना
असतेॽ
काय, कधी,
किती
प्रमाणात, कशा
अवस्थेतलं
खावं यासारख्या
मूलभूत
गोष्टींबद्दल
आपल्याला एकतर
प्रश्न पडत
नाहीत;किंवा पडले
तरी आपण
आपापल्या
पद्धतीने त्याकडे
दुर्लक्ष
करतो आणि
जिभेचे चोचले
पुरविण्याचे
उद्योग करत
राहतो. पण
डॉ.केळकरांनी
नेमकं याच
मर्मावर बोट
ठेवत
एकप्रकारे
सर्वांची
कानउघाडणीच
केली असं
म्हंटलं तर
गैर ठरणार
नाही.आनुवंशिकता
वगैरे काही
नसते,चुकीची जीवनशैली
हे रोगांचं
खरं कारण आहे.
औषधांनी रोग
बरा होणं
अपेक्षित
असेल तर मग ती
औषधं आयुष्यभर
का घ्यावी
लागतातॽक्षुद्र
वाटणाऱ्या
कीटकापासून
इतर सगळे
प्राणी
स्वतःची
काळजी स्वतः
घेऊ शकतात, तर
मग माणसालाच
औषधं
वगैरेंसारख्या
बाहेरच्या
मदतीची गरज का
भासतेॽशरीरात काही
बिघाडझाला तर ते शरीराला
लगेच समजतं
आणि तशी
सूचनाही
मेंदूला
मिळते,पण आपण
त्याकडे लक्ष
देतो काॽभूक
लागली तरच
खावं आणि भूक
नसेल तर खाऊच
नये इतकी साधी
गोष्ट
आपल्याला का
समजत नाहीॽअसंख्य
प्रक्रिया
केलेलं,
शिजवलेलं अन्न
खाऊ नका.
कच्च्या
भाज्या खा,फळं
खा.त्यापेक्षाही
उत्तम म्हणजे
काहीच खाऊ
नका. लंघन करा.
अशी अनेक ‘धक्कादायक’
वाटणारी
विधानं करत
डॉ.केळकरांनीआहार
आणि एकंदरीतच
आरोग्याविषयीच्या
अनेक रूढ
कल्पनांना
छेद दिला.
अर्थात तेही
हलक्या फुलक्या
भाषेत आणि
हसतखेळत.
आपल्या
तथाकथित ‘धावत्या’
जीवनशैलीत
आरोग्यासारखा
महत्त्वाचा
विषय जर optionला
पडला असेल तर
जागे
होण्याची हीच
वेळ आहे, असं
सांगणारं
डॉ.केळकरांचं ‘अवांतर’
मधील हे सत्र
माहितीपूर्णआणि
आनंदाचं ठरलं
यात शंकाच
नाही.