style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | Avantar:November 2017

 

नोटाबंदीचे परिणाम-एक तटस्थ विवेचन.

भारताचं ८६ टक्के चलन ५०० आणि १००० च्या नोटांच्या रूपात होतं. त्यामुळे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी या नोटांवरील बंदी खूप महत्त्वाची ठरली. काळा पैसा बाहेर काढणे, खोट्या नोटांचा प्रश्न सोडवणे आणि अतिरेकी कारवायांना आळा घालणे हे तीन प्रमुख उद्देश समोर ठेवून नोटबंदी केली गेली होती.

नोटाबंदीचं पाऊल धाडसी आणि अनपेक्षित होतं. त्यामुळे लोक गांगरून गेले आणि एटीएम किंवा बँकेबाहेरच्या रांगांचे प्रकार त्यातून घडले. पण हळूहळू बरेच चांगले बदल झालेले दिसून आले. मोठ्या व्यवहारांपासून ते अगदी लहानसहान खर्चांपर्यंत कशासाठीच शक्यतो रोख रक्कम वापरायची नाही, ही सवय सामान्यजनांमध्ये रुजू लागली. वरकरणी गोंधळाची स्थिती दिसली तरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे बरेचसे चांगले बदल झाले. उदा. काळा पैसा काही प्रमाणात बाहेर आला, अतिरेकी कारवायांना बराच आळा बसला, गैरव्यवहारांना पायबंद घालण्यात यश आले वगैरे.

नोटाबंदीमुळे काही विपरीत परिणामही झाले. विशेषतः मोलमजुरी करणाऱ्यांसारख्या असंघटित लोकांना याची फार मोठी झळ बसली. छोट्या उद्योगांना अडचणींना सामोरं जावं लागलं. पण शेअर बाजाराचा निर्देशांक वाढतो आहे आणि यापुढेही तो अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात म्हणजे नोटाबंदी जाहीर केल्यानंतरचे पहिले काही महिने गोंधळाचे होते. पण नंतर हळूहळू परिस्थिती सुरळीत होऊ लागली आणि भविष्यात या निर्णयाचे सकारात्मक परिणाम पहायला मिळू शकतात.

हे आणि असेच आणखी काही मुद्दे मांडत श्री. अरविंद परांजपे यांनी नोटाबंदीनंतरच्या वर्षभरातल्या घटनांचा आढावा घेतला. अवांतरमधील या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिलेल्या श्रोतृवर्गाने त्यांना बरेच प्रश्नही विचारले आणि श्री.परांजपे यांनी श्रोत्यांचे शंकानिरसनही केले. एकंदरीतच नोटाबंदीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयावरचा हा कार्यक्रम छान रंगला.

असेच वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण अवांतरच्या प्रत्येक सत्रात भेटणार आहोत. तर मग पुढच्या अवांतर मध्ये भेटूया नक्की!

डिसेंबर महिन्यातल्या अवांतरचा विषय आहे- मी पाहिलेला चीन आणि या विषयावर बोलणार आहेत श्रीमती चंदा कानेटकर.

तर मग या आणखी एका वेगळ्या विषयासाठी २० डिसेंबर,२०१७ चा दिवस आणि संध्याकाळी पाच वाजताची वेळ नक्की राखून ठेवा.English Summary

Flushing out the black money, fake currency note detection and to restrain terrorism these were the three main objectives of demonetisation. India’s 86% of Currency was in the form of 500 and 1000 rupee’s notes. That’s why demonetisation became important in the process of flushing out the black money.

Decision of the Demonetisation was really a courageous and an unexpected leap. In the beginning there was confusion due to the lack of appropriate information, which led to the unending queuesoutside the banks. But, situation was changing gradually. Ordinary person’s mindset was changing. He was trying to avoid cash usage in the small as well as big transactions. At first, there was only chaos but underneath changes for good were happening. For e.g.some amount of black money was flushed out resulting in the steep decline in the terrorist activities, minimization of corruption. Informal Economy was being streamlined in Formal Economy.

But there was a grey side to it too. Some adverse effects of demonetisation were also seen. Labors who work on daily wages suffered the most in the whole process. Small scale occupations faced a lot of unforeseen issues.

But at the same time Sensex is rising day by day and It is expected to scale up in the future.

In short, in the beginning there were few hiccups. But situation is improving gradually. We will see the positive effects of demonetisation in near future.

Mr. ArvindParanjape succinctly stated process and effects of the demonetisation. He gave us a panoramic picture of the past year and upcoming years.

So keep attending the Avantar sessions to get some interesting inputs on different topics! Our topic for December is -My Experience with China. And the speaker is ChandaKanetkar.

So don’t forget to attend the next session of Avantar on 20th December, 2017, at 5 pm.

Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts