style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA

Avantar

Feb 2017
General Insurance
अवांतर या उपक्रमातील पहिला कार्यक्रम दि.१५.०२.२०१७ रोजी पार पडला.त्यावेळेस, श्री. विनायक देसाई यांनी जनरल इन्शुरन्स या विषयाची माहिती आपल्या सहज शैलीत उलगडून दाखविली.
.........Read More
March 2017
ओरिगामी
ध..मा..ल..म्हणजे काय त्याचा पुरेपूर प्रत्यय अवांतरच्या सत्राला आला. ओरिगामी म्हणजे, म्हटलं तर कागदाच्या घड्या घालून वस्तू बनविण्याची कला. पण त्या कलेतलं कसब काय काय करामती करू शकतं ते अगदी व्यवस्थित अनुभवायला मिळालं.
.........Read More
April 2017
निसर्गोपचार

रोज नेमका कोणता आहार घ्यायचा याची माहिती आपल्यापैकी कितीजणांना असतेॽ काय, कधी, किती प्रमाणात, कशा अवस्थेतलं खावं यासारख्या मूलभूत गोष्टींबद्दल आपल्याला एकतर प्रश्न पडत नाहीत; किंवा पडले तरी आपण आपापल्या पद्धतीने त्याकडे दुर्लक्ष करतो आणि जिभेचे चोचले पुरविण्याचे उद्योग करत राहतो.
.........Read More
May 2017
व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची कला

बुद्धिजीवी मंडळी नेहमी महत्त्व देतात, ते प्रखर बुद्धीला, कलागुणांना, कामाच्या क्षमतेला.त्यामानाने, विशेषतः मराठी मंडळी आपल्या दिसण्याला विशेष महत्त्व देत नाहीत.जेव्हा आपण संमिश्र समूहात वावरतो, 'तेव्हाप्रथमदर्शनात' कुणीतरीबाजी मारून जातं आणि कष्टाने केलेल्या कामाची, केवळ दर्शनी छाप न पडल्याने कमी दखल घेतली जाते, असा अनेकांचा अनुभव असेल.
.........Read More
June 2017
उत्तर आणि दक्षिण ध्रुवाची सफर

भटकंतीची आवड अनेकांना असते, पण कुठे आणि कुठल्या उद्देशाने भटकायला जायचे याबाबत प्रत्येकाचे ठोकताळे वेगळे असतात.सहसा नवी ठिकाणे पाहण्याबरोबरच खरेदी करणे हा एक प्रमुख हेतू घेऊन अनेकजण प्रवासाला जातात. या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण ध्रुवाची सफर करायची हौस बाळगणं म्हणजे अनेकांच्या भुवया उंचावायला वाव देण्यासारखंच आहे.
.........Read More
July 2017
श्वास, स्वभाव आणि प्रकृती

तुम्ही श्वास घेता काॽ

असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारलाय काॽ विचारलाच कधी तर तुम्ही नक्कीच त्या माणसाला वेड्यात काढाल. साहजिकच आहे ना! जन्मापासून मरेपर्यंत अगदी अविरतपणे केली जाते अशी एकच तर गोष्ट आहे, ती म्हणजे श्वास घेणं. इतकी स्वाभाविक असते ही क्रिया.
.........Read More
August 2017
घोडेस्वारी म्हणजे काय रे भाऊ?

"लकडी की काठी, काठी पे घोडा..." हे गाणं आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल आणि अनेकदा गुणगुणलंही असेल. खरंतर, लहानपणी अगदी बोबडे बोल बोलण्याच्या वयातच हा घोडा या ना त्या रूपाने आपल्याला दिसतो. कधी गाण्यांतून, बडबडगीतांमधून तर कधी प्रत्यक्ष.  अर्थात, प्रत्यक्ष म्हणजे खरा घोडा पहायला मिळो ना मिळो, पण खेळण्यातल्या लाकडी घोड्यावर बसण्याचा आनंद तर अनेकांनी लुटला असेल.
.........Read More
September 2017
गणितातल्या गमतीजमती

गणित फक्त अभ्यासातच नाही तर आपल्या रोजच्या जगण्यात, प्रत्येक गोष्टीत आहे. पाहण्याची नजर हवी फक्त. “उठायला उशीर झाला”, “अर्धा कप चहा घेतला”, “इतक्या रकमेचं पेट्रोल भरलं”, “भाजी महाग मिळाली”....ही आणि अशी अनेक वाक्यं आपण रोज बोलत असतो आणि त्या प्रत्येक वाक्यात कसलं ना कसलं तरी मोजमाप आहे. जिथे हे मोजमाप किंवा गणती असते तिथे गणित येतं. अगदी रोजच्या साध्या-साध्या गोष्टींपासून ते स्थापत्यशास्त्रापर्यंत सगळीकडे गणित आपल्याला भेटत राहतं. मग जे आपल्या आयुष्यात इतकं भिनलेलं आहे त्याचा बाऊ कशाला करायचाॽ
.........Read More
Octomber 2017
पोलीस करतात तरी कायॽ

पोलिसांची अपुरी संख्या आणि वाढते गुन्हे हा विषय तर अनेकांना माहीत असेल. त्याशिवायही, अशा अनेक अडचणी आहेत ज्यांतून मार्ग काढत त्यांना काम करावं लागतं; आणि त्यासाठी आपल्याकडून त्यांना कौतुकाची थाप वगैरे क्वचितच मिळते. तरीही त्यांची तक्रार नसते. जमेल तसं स्वतःला सांभाळत आपल्यासारख्या तमाम नागरिकांसाठी ही ‘वर्दीतली माणसं’ काम करत राहतात.
.........Read More
November 2017
नोटाबंदीचे परिणाम-एक तटस्थ विवेचन.

भारताचं ८६ टक्के चलन ५०० आणि १००० च्या नोटांच्या रूपात होतं. त्यामुळे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी या नोटांवरील बंदी खूप महत्त्वाची ठरली. काळा पैसा बाहेर काढणे, खोट्या नोटांचा प्रश्न सोडवणे आणि अतिरेकी कारवायांना आळा घालणे हे तीन प्रमुख उद्देश समोर ठेवून नोटबंदी केली गेली होती.
.........Read More
December 2017
चीनी मनी

चीनमध्ये जवळजवळ ८०० ते ९०० खेडी प्राचीन काळातली आहेत. त्यातल्या १९२ खेड्यांचं प्राचीन रूप आहे असं जतन करण्याचा एक प्रकल्प चीन सरकारने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आर्किटेक्ट या नात्याने काम करण्याची संधी चंदा कानेटकर यांना मिळाली. साहजिकच या निमित्ताने २०१५ पासून त्यांना चीनमधलं ग्रामीण वातावरण त्यांना अगदी जवळून अनुभवता आलं.
.........Read More
January 2018
सायकलींग

लहानपणी जरा कळू लागेपर्यंत खेळायला तीनचाकी सायकल आणून दिली जाते. त्या छोट्याशा सायकलीवरून कितीतरी लांबचे पल्ले गाठण्याचा खेळ लहानपणी अनेकांनी खेळला असेल. नंतर वयानुसार सायकलीचा आकार वाढत शाळा-कॉलेजपर्यंत बऱ्यापैकी मोठी सायकल हातात येण्याचं भाग्य अनेकांना लाभलं असेल. शाळा-कॉलेज, क्लास, अभ्यास, मित्रमैत्रिणींसोबतची भटकंती अशा अनेक ठिकाणी ती सायकल सोबत करते. मग कधीतरी अचानक दुचाकी गाडी घरात येते आणि सायकलीची साथ सुटते.
.........Read More
February 2018
हस्ताक्षरातून कळणारा माणूस.

अक्षर म्हणजे काय ते बहुतेक कळतही नसतं अशा वयात लहानपणी आपली अक्षर ओळख करून दिली जाते. हळूहळू कित्ते गिरवत हाताला वळण लागतं आणि प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने अक्षरं रेखू लागतो. अर्थातच लेखनाची ही कृती काळाच्या ओघात सवयीची होऊन जाते. त्यामुळेच की काय, अत्यंत गृहीत धरली गेलेली हस्ताक्षरासारखी ‘क्षुल्लक’ गोष्ट आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही सांगेल असा विचारही करत नाही आपण. तीच तर खरी गंमत आहे.
.........Read More
March 2018
छायाचित्रण

माणसांच्या प्रतिमा, घटना वगैरे जतन करण्यासाठी हजारो वर्षांपासून चित्रांची मदत घेतली जात होती. मग जेमतेम दोनेकशे वर्षांपूर्वी छायाचित्रकला म्हणजे फोटोग्राफीचा शोध लागला. साधारणपणे 1826-27 मध्ये जोसेफ नाईसफोर यांनी पहिलं छायाचित्र घेतल्याची नोंद सापडते. अर्थातच त्यावेळेस त्या तंत्राबद्दल खूप कुतूहल वाटलं होतं लोकांना. सुरुवातीच्या काळात छायाचित्रांत फक्त कृष्णधवल रंग दिसायचे. एक वेगळंच सौंदर्य होतं त्या काळ्यापांढऱ्या प्रतिमांमध्ये.
.........Read More
Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts